अहमदनगर : जिल्ह्यात यावर्षी २३ पैकी २१ साखर कारखान्यांकडून गाळप सुरू आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ४५ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले आहे.
मात्र, यावर्षी साखरेच्या उताऱ्यात घट झाल्याचे दिसून आले आहे.
खासगी साखर कारखान्यांचा उतारा सहकारी साखर कारखान्यांपेक्षा अव्वल ठरला आहे. सहकारी साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ८.५ टक्के आहे.
तर खासगी साखर कारखान्यांचा उतारा ८.४२ टक्के आहे. गेल्यावर्षी जिल्ह्याचा सरासरी उतारा ११.५० टक्के इतका होता.
शेतकऱ्यांना देण्यात येणारा ऊस दर साखरेच्या उताऱ्यावर अवलंबून असतो. यावर्षी साखरेचा उतारा गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहे. मात्र, गळीत हंगामाच्या अंतिम टप्प्यापर्यंत उताऱ्यात वाढ होऊ शकते.