नवी दिल्ली: कोरोना विरोधात वैक्सीन लवकरच तयार होण्याची शक्यता आहे. अशामध्ये देशामध्ये इतक्या मोठ्या स्तरावर वैक्सीच्या वितरणासाठी भारतीय वायुसेनेने कंबर कसली आहे. वायुसेनेने आपले मालवाहक जहाज आणि हॅलिकॉप्टर सह 100 विमानांना वैक्सीन कार्यक्रमासाठी तयार केले आहे. असे मानले जात आहे की, देशाच्या दूर दूरच्या परिसरामध्ये वैक्सीन घेवून जाण्यासाठी एअरलिफ्ट ची गजर भासू शकते.
हे लक्षात ठेवून, वायुसेनेने तीन वेगवेंगळ्या प्रकारच्या विमाने तयार केली आहेत, जी वैक्सीन वितरणामध्ये मदतगार साबित होतील. फार्मा कंपन्यांकडून वैक्सीन 28 हजार कोल्ड चेन स्टोरेज पर्यंत पोचण्यासाठी मोठी जबाबदारी सी-जी 17 ग्लोबमास्टर, सी-130 जे सुपर हर्क्युलिस आणि आईएल 76 निभावतील.
छोट्या सेंटर्ससाठी एएन-32 आणि डॉर्नियर्स ची तैनात केली आहे. दूरच्या अंतराच्या डिलिवरीसाठी एएलएच, चीता आणि चिनूक हेलीकॉप्टर्स ची मदत घेतली जाईल. वायुसेनेशिवाय देशाची राजधानी दिल्ली आणि हैद्राबाद एअर कार्गो वैक्सीन च्या ट्रान्सपोर्ट साठी तयार आहेत. या दोन्ही हवाई अड्डयांवर वैक्सीन च्या कोल्ड स्टोरेज, एअरक्राफ्ट पासून स्टोरेज पर्यंत आणण्याच्या प्रक्रिया आणि सुरक्षेची तयारी करण्यात आली आहे.