नवी दिल्ली : विमान कंपन्या सध्या आर्थिक अडचणीत आल्या आहेत. या अडचणी कमी होण्याच्या आलेखापेक्षा यात वाढ च होत असल्याचे दिसून येत आहे. चालू आर्थिक वर्षअखेरीस भारतातील विमान कंपन्यांच्या तोट्याचा आकडा ४,२३० कोटी रुपयांवर पोहोचेल, असा अंदाज सीएपीएने (सेंटर फॉर एशिया पॅसिफिक एव्हिएशन) व्यक्त केला आहे.
भारतात सध्या इंडिगो, गो एअर, स्पाइसजेट, एअर एशिया, विस्तारा व एअर इंडिया या विमान कंपन्या कार्यरत आहेत.
विशेष म्हणजे, सीएपीएने यापूर्वी भारतीय कंपन्यांना चालू आर्थिक वर्षात ५० ते ७० कोटी अमेरिकी डॉलरचा नफा होईल, असे म्हटले होते. भारतीय विमानसेवाक्षेत्राने यंदा १६ वर्षांतील खराब कामगिरी नोंदवली आहे. जेट एअरवेज बंद पडणे तसेच, विमानांसाठी इंधनदर कमी होणे आदी अनुकूल स्थितीचा अन्य कंपन्या लाभ घेऊ शकल्या नाहीत, असे सीएपीएने म्हटले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.