लखीमपुरखीरी : विभागातील अजबापूर साखर कारखान्याने सोमवारी गळीत हंगामाची समाप्ती केली. सध्याच्या हंगामात कारखान्याने १ कोटी ६२ लाख क्विंटल उसाचे गाळप केले.
डीसीएम श्रीराम समुहाच्या विभागीय साखर कारखाना अजबापूरने तीन नोव्हेंबर २०२० रोजी गाळप हंगामास प्रारंभ केला होता. सोमवारी २४ व्या गाळप हंगामाची समाप्ती करण्यात आली. ऊस विभाग प्रमुख सुभाष खोखर यांनी सांगितले की, या हंगामात १७४ दिवस कारखाना सुरू ठेवून १ कोटी ६२ लाख क्विंटल उसाचे गाळप केले. तर गेल्यावर्षी कारखान्याने १९४ दिवसांचे कामकाज करून १ कोटी ७८ लाख क्विंटल उसाचे गाळप केले होते. यावर्षी ऊसावरील ०२३८ या प्रजातीवरील लाल सड रोगामुळे साखर उत्पादनावर परिणाम झाला आहे. आता कारखाना प्रशासनाने या रोगाला आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
यावर्षी शेतकऱ्यांनी ०२३८ ऐवजी ०११८ आणि ९४१८४ या प्रजातीच्या उसाची लागवड केली आहे. नेहमीप्रमाणे कारखान्याने त्वरीत ऊस बिले अदा केली आहेत. कारखान्याने ४ एप्रिलपर्यंत खरेदी केलेल्या उसाचे पैसे बँकांकडे पाठविले आहेत. गाळप हंगाम समाप्तीवेळी विभाग प्रमुख पंकज सिंह, ऊस विभागप्रमुख सुभाष खोखर, ए. ए. जैदी, अजयपाल सिंह, रमेश चौधरी, सत्यप्रकाश मिश्र, सोमवीर सिंह आदी उपस्थित होते.