सातारा : नेहमीप्रमाणे उच्चतम दर देण्याची परंपरा कायम ठेवत अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना होवू घातलेल्या हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसाला किफायतशीर दर देण्यासाठी कटीबध्द आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. कारखान्याच्या २०२४-२०२५ च्या गळीत हंगामाकरिता मशिनरी विभागाकडील पहिल्या रोलर पूजन प्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना ऊसाला चांगला दर मिळावा आणि त्यांचे आर्थिक जीवनमान उंचवावे, हे स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न पूर्ण करीत आहे. कारखान्यात यंत्रसामुग्री देखभाल, दुरुस्ती आदी कामे प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, कारखान्याच्यावतीने प्रत्येक गाळप हंगाम यशस्वी करून शेतकऱ्यांना वेळेवर १०० टक्के एफआरपी दिली जाते. गाळपास आलेल्या ऊसाचे संपूर्ण पेमेंट वेळेत आदा केले असल्यामुळे ऊस उत्पादक, सभासद, बिगर सभासदांमध्ये कारखान्याबाबत समाधान आहे. यावेळी कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, व्हा. चेअरमन नामदेव सावंत, संचालक मंडळाचे सर्व सदस्य, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, ज्येष्ठ संचालक रामचंद्र जगदाळे, लालासाहेब पवार, सर्जेराव सावंत, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या माजी सभापती वनिता गोरे, जिल्हा बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे, माजी सभापती सरिता इंदलकर, धर्मराज घोरपडे, मिलिंद कदम, राहुल शिंदे, दादा शेळके, अरविंद चव्हाण, विक्रम पवार आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.