कोल्हापूर: वसंतराव देसाई आजरा सहकारी साखर कारखान्याचा यावर्षीचा गळीत हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने मशिनरी ओव्हर होलिंगची कामे गतीने सुरू आहेत. कारखान्याकडे गळीत हंगामासाठी ८ हजार हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झालेली आहे. ४ लाख मे. टन ऊस गाळपाचे कारखान्याने नियोजन केले आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे यांनी केले. यंदाच्या गळीत हंगामासाठी कारखान्यात मिल रोलरचे पूजन कारखान्याचे उपाध्यक्ष मधुकर देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
अध्यक्ष वसंतराव धुरे यांनी सांगितले की, कारखान्यात मशिनरी देखभाल दुरुस्तीची कामे आहेत. सप्टेंबरपूर्वी ओव्हर होलिंगची कामे पूर्ण करून कारखाना गळीतासाठी सज्ज ठेवणार आहे. गळीत हंगामासाठी ३५० बीड व लोकल तोडणी वाहतूक यंत्रणा कारखान्याने भरलेली असल्याचे त्यांनी सांगितले. संचालक सुधीर देसाई, विष्णू केसरकर, मुकुंद देसाई, मारुती घोरपडे, सुभाष देसाई, अनिल फडके, दीपक देसाई, रणजित देसाई, संभाजी पाटील, शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरुकटे, राजेश जोशीलकर, संभाजी दत्तात्रय पाटील, गोविंद पाटील, काशीनाथ तेली, हरी कांबळे, रचना होलम, मनीषा देसाई, रशिद पठाण, प्र. कार्यकारी संचालक व्ही. के. ज्योती, संभाजी सावंत, सुरेश शिंगटे आदी उपस्थित होते.