आजरा साखर कारखाना जिल्हा बँकेच्या कर्जावर अवलंबून !

कोल्हापूर : आजरा कारखाना अनेक संकटे पार करत उभा आहे. सहकारामधून खासगी, भागीदार, बंद नंतर पुन्हा सहकार अशी कारखान्याची आजवरची वाटचाल सुरू राहिली आहे. ऊस उत्पादन व साखर विक्री हीच सध्याची स्थिती आहे. गाळपही फारसे नाही. त्यामुळे कारखाना आता जिल्हा बँकेच्या कर्जावर अवलंबून आहे. कारखाना स्वबळावर चालण्यासाठी संचालक, सभासद, कर्मचारी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या इच्छाशक्तीची गरज आहे.

दरवर्षी आजरा साखर कारखाना व्यवस्थापनाकडून ४ लाख मे. टन गाळप करण्याचा संकल्प केला जातो. मात्र संकल्प पूर्तीपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे कारखान्याचे गणित तोट्याचे बनते. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ३ लाख मे. टन ऊस आहे. बाहेरील साधारणतः लाख, दीड लाख मे. टन ऊस येतो; मात्र कार्यक्षेत्रातील ६० हजार मे. टन ऊस बाहेरील कारखान्यांना जातो. याला स्थानिक राजकारण, नियोजनाचा अभाव कारणीभूत आहे. कारखान्यावर १७० कोटींचे कर्ज आहे. संचालक मंडळाने आपल्या कार्यक्षेत्रात असलेल्या सुमारे सव्वातीन लाख मे. टन ऊसाचे कार्यक्षेत्र कसे वाढेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना बियाणे पुरवठा, खते उपलब्ध करून मदतीची गरज आहे. तरच शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here