कोल्हापूर : वैधमापन शास्र निरीक्षकांच्या भरारी पथकाने आजरा साखर कारखान्याच्या दोन्ही ऊस वजनकाट्यांची अचानक भेट देऊन तपासणी केली. यामध्ये काटे अचूक असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर केलेल्या या तपासणीत ट्रक व ट्रॅक्टरचे वजन केले. त्यामध्ये तफावत आढळून आली नाही. त्यामुळे वजनकाटे निर्दोष असल्याचा निर्वाळा देण्यात आला.
वैधमापनशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारखान्याचे ऊस, साखर व उपपदार्थ वजन करणारे सर्व काटे बिनचूक तपासले. याचा तपासणी करून अहवाल त्यांनी दिला. भरारी पथकाचे अधिकारी एम. व्ही. देसाई, निवासी नायब तहसीलदार के. डी. ढेरे, पोलिस प्रतिनिधी एल. जी. आकुलवार, तृतीय विशेष लेखापरीक्षक प्रतिनिधी अविनाश शिंगाडी, निरीक्षक वैधमापन शास्त्र गडहिंग्लज यांनी तपासणी केली. यावेळी प्र. कार्यकारी संचालक व्ही. के. ज्योती, एस. के. सावंत आदी उपस्थित होते.