कोरोना संकटामध्ये एका आठवड्यात ऊस तोडणी अशक्य: अखिलेश यादव

लखनऊ: समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ऊस शेतकऱ्यांच्या मुद्दयावरुन सरकारला लक्ष्य केले आहे. साखर कारखाने शेतकऱ्यांवर एका आठवडयात ऊस तोड करावी, असा दबाव टाकत आहेत, जे कोरोना संकटात अशक्य आहे, अशी बाब यादव यांनी उपस्थित केली आहे.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्विटर च्या माध्यमातून ऊसाने भरलेल्या ट्रॉलींचा व्हिडिओ टाकून लिहिले आहे की, पश्चिमी उत्तर प्रदेशात ऊस शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता एका आठवड्यात ऊस तोडणीचा दबाव कारखान्यांकडून शेतकऱ्यांवर येत आहे, जे कोरोना संकटात अशक्य आहे.

Audio Player

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here