‘आक्रोश’ पदयात्रेला सांगली जिल्ह्यातून आजपासून पुन्हा सुरुवात

कोल्हापूर / सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रोश पदयात्रेला शुक्रवारी (3 नोव्हेंबर) पुन्हा सुरुवात झाली. मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी 22 दिवसाची 522 किलोमीटरची आक्रोश पदयात्रा १३ व्या दिवशी स्थगित केली होती. मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण गुरुवारी स्थगित झाले. त्यामुळे शुक्रवारी सकाळी ८ वाजता राजारामबापू पाटील साखर कारखाना, साखराळे (जि. सांगली) येथून पदयात्रेला पुन्हा सुरुवात झाली.

गेल्या वर्षीच्या उसाला प्रतिटन अतिरिक्त 400 रुपयांचा हप्ता देण्याच्या मागणीबाबत साखर कारखाने आणि शेतकरी संघटनांची गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेली दुसरी बैठक निष्फळ ठरली. बैठकीतून कोणताही तोडगा निघाला नाही. दुसरी संयुक्त बैठक निष्फळ ठरली. यानंतर राजू शेट्टी यांनी साखर कारखानदाराकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आता पुन्हा एकदा पदयात्रा सुरू करणार असल्याचे जाहीर केले होते.

साखर कारखान्यांनी गत गळीत हंगामात चांगला पैसा मिळविला असून ऊस उत्पादक शेतक-यांचा उत्पादन खर्च वाढल्याने कारखान्यांनी या वर्षीचा गळीत हंगाम सुरू होण्याआधी ४०० रूपयाचा दुसरा हप्ता द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राजारामबापू साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर केली.

१७ ॲाक्टोंबरपासून राजू शेट्टी यांनी गत गळीत हंगामातील ऊसाला दुसरा हप्ता ४००रूपये व राज्यातील सर्व साखर कारखान्याचे वजनकाटे डिजिटल करण्यासाठी २२ दिवसाची ५२२ दिवसाची आक्रोश पदयात्रा सुरु आहे. दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्याने ३० ॲाक्टोंबर रोजी पदयात्रा स्थगित केली होती. शुक्रवारी राजारामबापू कारखान्यास निवेदन देवून तिथून परत पदयात्रेस पुन्हा सुरवात करण्यात आली.

साखर कारखानदारांनी कारखान्याची गाळप क्षमता वाढविली असून या खर्चाचा बोजा शेतक-यांच्यावर टाकला जात आहे. कोट्यावधी रूपयाचा चुराडा करून प्रकल्प उभे केले जात आहेत. या प्रकल्पाच्या कर्जाचा बोजा यंदा साखर कारखान्यांनी शेतक-यांच्या जादा आलेल्या ऊत्पन्नातील हिस्यावर टाकून कारखान्यांनी तो पैसा कर्ज खात्यास वर्ग केला आहे. यामुळे कारखान्यांनी कोणतेही कारण न सांगता ४०० रूपयाचा दुसरा हप्ता द्यावा, अशी मागणी शेट्टी यांनी यावेळी केली. यावेळी राजारामबापू कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. माऊली यांनी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे निर्माण झालेल्या कारखानदाराच्या समस्यांचा पाढा वाचला. राजारामबापू यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून त्याचठिकाणी कारखाना पदाधिकारी यांना ४०० रूपयाचा हप्ता दिल्याशिवाय कारखाना सुरू न करण्याचे निवेदन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here