अल्जीयर्स : अल्जेरीयाने साखर, पास्ता, गहू, वेगोईल अशा खाद्य पदार्थांच्या निर्यातीवर निर्बंध लागू केले आहेत, असे वृत्त सरकारी वृत्तसंस्था एपीएसने दिले आहे.
APS एजन्सीने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, मांस उत्पादनांवरील आयातीवरही निर्बंध लावण्यात आले आहेत. अनेक देशांनी अन्नधान्यासह अनेक जीवनोपयोगी वस्तूंच्या निर्यातीवर निर्बंध लागू केले आहेत. युक्रेनवर रशियाने केलेल्या आक्रमणानंतर अनेक देशांची आयात-निर्यात खंडीत झाली आहेत.
अलिकडेच रशियासोबत सुरू असलेल्या संखघर्षामुळे अन्नधान्य टंचाई असल्याने युक्रेननेही साखरेसह काही खाद्य पदार्थांची निर्यात रोखण्याचा निर्णय घेतला होता.