चीन चे सर्वात श्रीमंत लोकांमध्ये सामिल जैक मा यांच्या बाबतीत शंका व्यक्त केली जात आहे की, ते बेपत्ता झाले आहेत. यापूर्वी त्यांनी चीनच्या सरकारी एजन्सीच्या कामकाजाच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते. जैक मा जवळपास दोन महिन्यापासून कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसलेले नाहीत. स्वत:च्या बनवलेल्या टीव्ही शो अफ्रीका के बिजनेस हिरो मध्येही जैक मा यांच्या जागी दुसर्या कुणाला तरी पाठवले आहे. अलीबाबा कंपनी चे एक प्रवक्ता यांनी सांगितले की, शेड्यूल कंफ्लिक्ट मुळे जैक मा टीव्ही शो मध्ये सामिल झाले नाहीत.
जैक मा बेपत्ता झाल्याने हा संकेत मिळतो आहे की, ते अनेक संकटांचा समाना करत आहेत. चीनमध्ये श्रीमंत लोक बेपत्ता होण्याच्या घटना नव्या नाहीत. फोर्ब्स यांच्या रिपोर्टनुसार, 2016 ते 2017 च्या दरम्यान चीनमधून अनेक अरबपती बेपत्ता झालें होते.
रिपोर्टनुसार, 2016 ते 2017 च्या दरम्यान बेपत्ता झालेले अनेक लोक पुन्हा दुसर्यांदा समोर आलेले नहीत. असा संशय आहे की, या अरबपतींच्या गायब होण्या मागे त्यांच्या पत्नी, प्रेमीका, व्यापार प्रतिस्पर्ध्यांचा हात होता. पण जेव्हा गायब झालेले काही श्रीमंत परतले तेव्हा त्यांनी सांगितले की, ते अधिकार्यांची मदत करत होते.
नोव्हेंबरमध्ये जैक मा यांनी चीनच्या रेग्युलेटर्स आणि सरकारी बँकांची आलोचना केली होती. यानंतर चीनी अधिकार्यांनी जैक मा यांच्यावर पलटवार केला होता आणि त्यांची कंपनी एंट ग्रुप च्या आईपीओ ला स्थगित केले होते.
गेल्या आठवड्यात चीनच्या एजन्सी ने सांगितले होते की, त्यांनी जैक मा यांची कंपनी एंट ग्रुप विरोधात एंटीट्रस्ट तपासणी सुरु केली आहे. तसेच एंट ग्रुप ला कंज्युमर फाइनॅन्स ऑपरेशन थांबवण्याचाही आदेश दिला होता.