अलिगढ: साखर कारखान्याच्या विस्तारीकरणसाठी ५०.५५ कोटींचा निधी

अलिगढ : राज्य सरकारने जिल्ह्यातील एकमेव साखर कारखान्याच्या क्षमता वाढीसह विस्तारीकरणाचे आश्वासन पूर्ण करताना यासाठी अर्थसंकल्पातून ५०.५५ कोटी रुपये जारी केले आहेत. ही योजना राबविण्यासाठी उत्तर प्रदेश सहकारी साखर कारखाना संघाच्यावतीने सुधारित डीपीआर सरकारला पाठविण्यात आला आहे. या निधीचा वापर करून साखर कारखान्याचे विस्तारीकरण केले जाईल.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कारखान्याची क्षमता १२५० टीसीडीपासून वाढवून १७०० टीसीडी केली जाईल. शेतकऱ्यांनी गेल्या पाच वर्षापासून साखर कारखान्याचे नवीन युनिट स्थापन करण्याची मागणी केली होती. साथा साखर कारखान्याबाबत गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बजेटमध्ये घोषणा केली होती. यामध्ये इंटिग्रेटेड शुगर कॉम्प्लेक्सच्या रुपात कारखान्याचा बदल केला जाईल असे सांगत सरकारने नव्या साखर कारखान्याची स्थापना करण्याचे पहिले पाऊल उचलल्याचे सांगितले होते. मात्र, आता या निधीतून कारखान्याचे आधुनिकीकरण केले जाईल असे सांगण्यात आले. त्यासाठी ५०.५५ कोटी रुपये जमा केले आहेत.

साथा साखर कारखान्याचे महा व्यवस्थापक राहुल कुमार यादव यांनी सांगितले की, साखर कारखान्याच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यासाठी डीपीआर पाठविण्यात आला आहे. लखनौहून आलेल्या एका पथकाने कारखान्याची पाहणी करून अहवाल सरकारकडे जमा केला आहे अशी माहिती व्यवस्थापक यादव यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here