मुरादाबाद : जिल्ह्यातील चारही साखर कारखाने सुरू झाले आहेत. रानीनांगल आणि बिलारी साखर कारखाने सुरू करण्यात आले आहेत. पावसामुळे ऊस पिक आणि साखर कारखान्याच्या परिसरात पाणी असल्याने उसाचे गाळप सुरू करण्यास उशीर झाला आहे. २०२१-२२ चा गळीत हंगाम दीवाळीपूर्वी सुरू करण्याचे प्रयत्न होते. मात्र, पावसामुळे या नियोजनात बदल करावा लागला आहे.
जिल्हा ऊस अधिकारी डॉ. अजय सिंह यांनी सांगितले की, अगवानपूर तसेच बेलवाडा कारखाना सात नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. सोमवारी रानीनांगल आणि बिलारी या कारखान्यांनीही गाळपास सुरुवात केली. जिल्ह्यात ठिकठिकाणी ऊस खरेदी केंद्रे सरू झाली आहेत. जिल्ह्यात १ लाख ३० हजार शेतकरी कारखान्यांना ऊस पुरवठा करतील. लवकरच कारखाने आपल्या पूर्ण क्षमतेने गाळप करतील. त्यातून शेतकरी वेळेवर गव्हाची पेरणी करू शकतात. शेतकऱ्यांना मोबाईलच्या माध्यमातून ऊस तोडणी पावत्या पाठवण्यात येत आहेत. ज्या शेतकऱ्यांना तोडणीत अडचणी येत आहेत, त्यांनी त्वरीत संपर्क साधावा. शेतकरी यासाठी ऑनलाईन तक्रीर नोंदवू शकतात.
दरम्यान, दीवाळीपूर्वी कारखाने सुरू होऊ न शकल्याने शेतकऱ्यांना अडचीशे रुपये क्विंटल दराने ऊस गुऱ्हाळाला विकावा लागला आहे. उत्तर प्रदेशमध्ये सध्या ३२५ रुपये क्विंटल ऊस दर आहे. नव्या हंगामात २५ रुपये दर वाढवला आहे. मात्र, अद्याप शेतकऱ्यांना याचा फायदा मिळालेला नाही.