कृषी आणि ग्रामीण मजुरांसाठी अखिल भारतीय ग्राहक दर निर्देशांक क्रमांक (आधार: 1986-87=100) मे, 2022 साठी प्रत्येकी 6 आणि 5 अंकांनी वाढून अनुक्रमे 1186 (एक हजार एकशे शहाऐंशी) आणि 1197 (एक हजार एकशे सत्त्याण्णव ) झाला आहे.
चलनफुगवट्यात झालेली वाढ प्रामुख्याने अन्न गटातून नोंदवण्यात आली आहे. मुख्यत: तांदूळ, डाळी, दूध, बकरीचे मांस, मिरची कोरडी, लसूण, आले, भाजीपाला आणि फळे इत्यादींच्या किमतीत वाढ झाल्यामुळे निर्देशांकात वाढ झालेली दिसते.
ग्रामीण मजुरांच्या बाबतीत 12 राज्यांमध्ये 1 ते 17 अंकांची वाढ नोंदवली गेली आणि 7 राज्यांमध्ये 1 ते 5 अंकांची घसरण नोंदविण्यात आली असून केरळमधील आकडेवारी मात्र स्थिर आहे.1360 अंकांसह तामिळनाडू अव्वल तर हिमाचल प्रदेश 968 अंकांसह तळाशी आहे.
जून 2023 साठी शेतमजूर आणि ग्रामीण मजुरांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक(सामान्य आणि गटाप्रमाणे)
(Source: PIB)