संत तुकाराम कारखान्याच्या निवडणुकीत सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय

पुणे : कासारसाईतील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विदुरा उर्फ नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलने पुन्हा दणदणीत विजय मिळविला. नवले यांच्या हिंजवडी ताथवडे गटातूनच कासरसाईचे माजी सरपंच बाळासाहेब भिंताडे यांनी माघार न घेतल्याने एका जागेसाठी निवडणूक लागली होती. यामध्ये भिंताडे यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. विदुरा विठोबा नवले यांना (८५२४) मते, दत्तात्रय गोपाळ जाधव (८३८०) मते, चेतन भुजबळ यांना (७१८९) मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार बाळासाहेब भिंताडे यांना केवळ २५०५ मते मिळाली.

निवडणूक निर्णय अधिकारी मुकूंद पवार यांनी निकाल जाहीर केला. मुळशी, मावळ, खेड, हवेली व शिरूर या पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या कारखान्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलचे नेते विदुरा नवले, दत्तात्रय जाधव व चेतन भुजबळ यांच्याशी झाला. संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी दि. ५ रोजी पाचही तालुक्यातील ५७ मतदान केंद्रावर ९५१५ जणांनी मतदान केले. त्यापैकी ११२ मते बाद झाली. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. नवनिर्वाचित संचालक मंडळाने नवले यांचे अभिनंदन करत पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. माजी उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी सर्वांचे आभार मानले. सहाय्यक निवडणूक अधिकारी सर्जेराव कांदळकर, सचिन सरसमकर, बाळकृष्ण घुगे, उमेश थिटे, संगीता चौधरी, मंदार कुलकर्णी, सुनंदा शिंदे, सचिन भिडे व कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक साहेबराव पठारे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here