रहरा, उत्तर प्रदेश : गंगेश्वरी ब्लॉक परिसरामध्ये भारतीय किसान यूनियन ची मासिक बैठक झाली. बैठकीचे अध्यक्षस्थान अकबर बादशहा यांनी स्विकारले, तर सूत्रसंचालन ठाकुर महेश यांनी केले.
रविवारी बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष चौधरी रामपाल सिंह यांनी सांगितले की, ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत क्षेत्रातील सर्व साखर कारखाने सुरु केले जावेत. ऊस थकबाकी लवकरात लवकर भागवावी. ऊसाला 400 रुपये प्रतिक्विंटल दर द्यावा. तसेच शेतकर्यांना दुसर्या साखर कारखान्यातही ऊस विकण्याचा अधिक़ार द्यावा.
तहसील अध्यक्ष ठाकुर महेश यांनी सांगितले की, रहरा विजघर मध्ये तलावडा गावात एक नवा फीडर सुरु केला जावा. साखर कारखान्यांकडून 0238 प्रजातिचे ऊसच खरेदी केले जावेत. तांदुळ खरेदी केंद्रांवर प्रत्येक प्रकारचा तांदुळ खरेदी करावा. गंगवार बीज भंडारावर एक कंप्यूटर ऑपरेटर ची नियुक्ती केली जावी. बँकांमध्ये केसीसी च्या नावावर शेतकर्यांकडून अवैध वसुली बंद करावी. बैठक़ीमध्ये शेतकर्यांच्या समस्यांबाबत भाकियू 16 ऑक्टोबरला कमिश्नरी मुरादाबाद तसेच 26 ऑक्टोबरला कार्यकारी अभियंता यांना घेराव घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी महीपाल सिंह, टीटू त्यागी, महेश पहलवान, चौधरी फूल सिंह, शीशपाल सिंह, गुल्ली सिंह, हरपाल सिंह आदी शेतकरी उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.