पांडुरंग कारखान्याकडून सर्व ऊस बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा : कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी

सोलापूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२३ २४ मध्ये गाळप केलेल्या संपूर्ण ऊस बिलाची व तोडणी वाहतूक बिलाची रक्कम बँकेत जमा केली आहे. चेअरमन, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आतापर्यंत प्रती टन २,८०० रुपयांप्रमाणे ऊस बिल अदा केल्याची माहिती कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी दिली.

कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी म्हणाले, यंदाच्या गळीत हंगामात उसाची कमतरता जाणवेल असा अंदाज होता. परंतु, योग्य वेळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या उसाच्या एकरी टनेजमध्ये वाढ झाली. कारखान्याने या हंगामात १० लाख ७१ हजार १०० मे. टन उसाचे गाळप केले. ११.१५ टक्के सरासरी साखर उताऱ्याने ११ लाख ५२ हजार ६१० क्विंटल साखर पोती उत्पादित केली आहेत. ऊस बिलाचा पहिला हप्ता २८०० रुपये प्रती टनप्रमाणे दिला आहे. ही रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर बँकेत जमा केली आहे. गळीत हंगाम सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने कारखान्याचे चेअरमन माजी आ. प्रशांत परिचारक व व्हा. चेअरमन कैलास खुळे तसेच संचालक मंडळाचे सहकार्य लाभल्यामुळे हा हंगाम यशस्वीपणे पार पाडू शकलो असे कुलकर्णी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here