लातूर : मांजरा परिवारातील सर्वच साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे हित जपले आहे. त्यामुळे डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटने दिलेला पुरस्कार हा संपूर्ण मांजरा परिवाराचा आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले. देशमुख यांना नुकताच द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडिया पुणे या संस्थेचा साखर उद्योग गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याबद्दल निलंगा मतदारसंघ आणि काँग्रेसच्या जिल्हा डॉक्टर सेलच्यावतीने सोमवारी वलांडी येथे देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मल्लिकार्जुन मानकरी होते.
याप्रसंगी काँग्रेसच्या डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद भातांब्रे यांच्या हस्ते माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. खासदार डॉ. शिवाजी काळगे, माजी आमदार त्र्यंबक भिसे, राणीताई भंडारे, विजयकुमार पाटील, आबासाहेब पाटील, अजित बेळकोने, सुधीर मसलगे, सुतेज माने, अजित नाईकवाडी, अशोक कोरे, जावेद तांबोळी, इस्माईल लदाफ, मदन बिरादार, व्यंकटराव हंद्राळे, अविनाश रेशमे, भागवत वंगे, शरण लुल्ले, अमर मुर्के, सुनील नाईकवाडी, सतीश शिवने उपस्थित होते.