नागपूर : भविष्यात सर्व वाहने इथेनॉलवर सुरू राहणार आहेत, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. पेट्रोलवरील खर्च बायो इथेनॉल पेक्षा अधिक आहे. इथेनॉलच्या वापरामुळे प्रदूषण कमी होईल. ऑटो रिक्षआपासून उच्च क्षमतेच्या कारपर्यंत सर्व प्रकारची वाहने इथेनॉलवर सुरू राहणार आहेत. केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अॅग्रो व्हिजनचे उद्घाटन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी अॅग्रो व्हिजनची सुरुवात करण्यात आली आहे. २४ ते २७ डिसेंबरपर्यंत आयोजित या कार्यक्रमात कार्यशाळा, कृषी वस्तू आणि उत्पादनांचे प्रदर्शन भरले आहे.
यावेळी गडकरी म्हणाले, हरित हायड्रोजन भविष्यात बहुपर्यायी इंधन असेल. शेतकऱ्यांनी या उत्पादनांचा लाभ उचलण्याची गरज आहे. बायोमास, बायो ऑरगॅनिक कचरा, सांडपाणी यापासून ग्रीन हायड्रोजन बनवले जाऊ शकते. हा कोळसा आयातीचा पर्याय असेल. इस्पात यंत्र, ट्रॅक्टर, बस, रेल्वे, इतर उद्योग हायड्रोजनवर चालतील. आता शेतकऱ्यांनी इथेनॉल, बायो एलएनजी, हरित हायड्रोजनचे उत्पादन करावे.