जालंधर : शिरोमणि अकाली दलाचे (एसएडी) आमदार पवन टीनू यांनी भोगपूर साखर कारखाना योजनेस होणाऱ्या विलंबासाठी राज्य सरकारला जबाबदार ठरवले आहे. एसएडी सरकारने आपल्या कार्यकाळात १०२ कोटी रुपयांची साखर कारखाना योजना आधीच मंजुर केली आहे. बँकांकडून संबंधीत प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काँग्रेस सरकार योजनेस उशीर करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
याबाबत Tribuneindia.com मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पवन टीनु यांनी सांगितले की, साखर कारखाना योजना २०१७ मध्ये पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, सरकारने यास उशीर केला. आता निवडणूक आल्यानंतर याच्या उद्घाटनाचे श्रेय काँग्रेस सरकार घेत आहे. याशिवाय, आम्ही उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांच्या एसएडी आमदारांविरोधात पोलिस कारवाई करण्याच्या घोषणेची निंदा करतो असे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, राज्यातील ऊस उत्पादक कर्जात बुडाले आहेत. शेतकरी कमी ऊस दरामुळे अस्वस्थ आहेत. शेतकऱ्यांच्या विरोधानंतर ऊस दरात सुधारणा केली गेली. हा दर हरियाणापेक्षा कमी आहे.