नवी दिल्ली : पुणेस्थित अल्फालॉजिक टेकसिस लिमिटेडने ३१ मार्च, २०२३ रोजी समाप्त झलेल्या तिमाहीत आपले तिमाही आणि वार्षिक आर्थिक परिणाम जारी केले आहेत. कंपनी माहिती तंत्रज्ञान आणि इंडस्ट्रियल स्टोरेज सोल्युशन्स क्षेत्रात यशस्वीरित्या कार्यरत आहे. आणि त्याच्या मजबूत आर्थिक स्थितीचे दर्शन यातून झाले आहे. Alphalogic Techsys चे व्यवस्थापकीय संचालक आणि CFO अंशु गोयल यांनी कंपनीच्या व्यावसायिक यशाविषयी विवरण सादर केले.
इथेनॉल उत्पादनात विस्तार…
गोयल यांनी सांगितले की, कंपनी आपल्या बायो-इथेनॉल प्लांटच्या माध्यमातून नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात प्रभावी कामकाज करीत आहे. हा प्लांट तुकडा तांदळापासून बायो इथेनॉलचे उत्पादन करेल. हा इको फ्रेंडली प्लांट असून एकीकृत बायो रिफायनरी योजना असेल. तुकडा तांदळाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा, इंधन वितरण कंपन्यांकडून खरेदीची गॅरंटी यामुळे अल्फालॉजिक टेकसिस इथेनॉल व्यवसायापासून चांगल्या रिटर्नची अपेक्षा करीत आहे. इथेनॉल प्लांट त्यांच्या परंपरात राईस मिल व्यवसायाचा विस्तार आहे आणि महाराष्ट्रात जवळपास २०० राईस मिल आणि मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि तेलंगणासारख्या शेजारील राज्यांमधील प्लांटची संलग्नता यातून पुरेसा लाभ मिळेल. अल्फालॉजिक टेकसिससाठी इथेनॉल व्यवसाय गेम चेंजर ठरेल अशी शक्यता आहे.
शानदार आर्थिक कामगिरी…
अल्फालॉजिक टेकसिसने ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीत एकूण ८.७१ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील समान कालावधीत मिळवलेल्या ३.४७ कोटी रुपयांपेक्षा तो अधिक आहे. या तिमाहीसाठी करानंतर नेट प्रॉफिट १.३० कोटी रुपये राहिले, जे गेल्या वर्षीच्या समान कालावधीत मिळवलेल्या ५९.८६ लाख रुपयांपेक्षा खूप जास्त आहे. ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने २२.९६ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. गेल्या आर्थिक वर्षात मिळवलेल्या १४.१४ कोटी रुपयांच्या तुलनेत हा महसूल ६२.४१ टक्के उल्लेखनिय वाढ दर्शवतो. या कालावधीसाठी करानंतरचा निव्वळ नफा ४.०७ कोटी रुपये राहिला, जो गेल्या आर्थिक वर्षात मिळवलेल्या २.०७ कोटी रुपयांच्या तुलनेत ९६.९६ टक्के अधिक आहे.
शुक्रवारी ट्रेडिंगच्या अखेरीस कंपनीचा स्टॉक अखेर ३९.५२ वर ट्रेड करीत होता. या स्टॉकने गेल्या एक वर्षात निफ्टीच्या १५.८६ टक्क्यांच्या तुलनेत ८२.८७ टक्के रिटर्न दिला आहे. आणि तीन वर्षाच्या कालावधीत निफ्टीच्या ९९.१५ टक्क्यांच्या तुलनेत ३९८.११ टक्के रिटर्न दिला आहे.