अॅमेझॉनने त्यांचे जगातील सर्वात मोठे युनिट भारतातील हैद्राबाद येथे सुरु केले आहे. या नव्या कॅम्पसची 15000 कर्मचार्यांची क्षमता आहे. भारतात मोठा विस्तार करण्याच्या अॅमेझॉनच्या महत्वाकांक्षी योजनेचाच हा भाग आहे. मागील तीन वर्षापासून हैद्राबाद येथील युनिटचे बांधकाम सुरु होते. या युनिटचे क्षेत्रफळ 18 लाख चौरस फूट इतके आहे. अमेरिके बाहेरील अॅमेझॉनच्या मालकीची ही पहिलीच इमारत आहे.
शहराजवळील हैद्राबादचा अर्थिक जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्या नानकरामगुडा येथे ही इमारत उभी होत आहे. देशातील 63,000 कर्मचार्यांपैकी 15,000 पेक्षा अधिक कर्मचारी याठिकाणी असतील. यामध्ये 1.5 दशलक्ष कंत्राटी कर्मचारी आहेत.
अॅमेझॉनचे भारतातील व्यवस्थापक अमित अग्रवाल म्हणाले, अॅमेझॉन भारतीय बाजारपेठेकडे ई कॉमर्सपलीकडे बघते आहे. अॅमेझॉनची फ्युचर रिटेल मधील 10 टक्के हिस्सा विकत घेण्यासंदर्भातही बोलणी सुरु आहे. कंपनी आता झोमॅटो आणि स्विगीप्रमाणेच खाद्यपदार्थाच्या डिलिव्हरीच्या व्यवसायातही उतरण्याच्या बेतात आहे. ही सुविधा भारतातील अॅमेझॉनच्या विस्तार क्षेत्राचा एक भाग आहे. तसेच ही योजना व्यवसायाशी संबंधित असलेल्या अर्थिक मंदीसाठीही लवचिक आहे.
अॅमेझॉनच्या ग्लोबल रिअल इस्टेट अॅन्ड फॅसिलिटीजचे उपाध्यक्ष जॉन स्कोटलर म्हणाले, ग्राहकांना अधिक उत्तम सेवा पुरवणे हे कंपनीचे उद्दीष्ट आहे. मागील 18 महिन्यात अॅमेझॉन प्राईमचे ग्राहक दुपटीने वाढले आहेत.
मागील पाच वर्षात अॅमेझॉनने मुंबईत ऑफिस स्पेस, अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस, एशिया पॅसिफिक प्रांत स्थापित केले आहेत. यामध्ये 13 राज्यात 50 केंद्रे, शेकडो डिलीव्हरी स्टेशन आणि सॉर्ट सेंटरची भर पडली असून यामुळे भारतात 2 दशलक्षाहून अधिक रोजगार निर्माण झाले आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.