बीड : अंबाजोगाई तालुक्यात यंदा कमी पाऊस झाला. सद्यस्थितीत अंबासाखर, रांजणी, येडेश्वरी, गंगा माऊली, रेणा या कारखाना क्षेत्रातील ग्रिन बेल्ट म्हणून ओळखाले जाणाऱ्या पंचक्रोशीत गावात नगदी पिक आसलेल्या ऊसाचे क्षेत्र सर्वाधिक नदी, छोटे बंधारे, कालवे कोरडेच आहेत. शेतकऱ्यांना पाण्याअभावी ऊस मोडण्याची तर ज्यांनी पाऊस पडेल या आशेने ऊस ठेवला आहे, त्या शेतकऱ्यांना उन्हाळ्यात ऊस जगवण्यासाठी जिवाचे राण करावे लागत आहे. त्यामुळे नविन ऊसाची लागवड झालेली नाही. असलेला ऊस ही पाण्याअभावी वाळत आहे. ऊसक्षेत्र घटल्याने सोयाबीन क्षेत्रात मोठी वाढ होणार आहे.
अंबाजोगाई तालुक्यासह जिल्ह्यात यावर्षी पावसळ्यात अत्यल्प पाऊस झाला. परतीचा धुंवाधार पाऊस झाला. रब्बीच्या सुगीत पाऊस पडेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण पावसाने हुलकावणी दिल्यामुळे यंदा दुष्काळाची छाया पसरल्याचे दिसत आहे. मांजरा प्रकल्प व इतर छोठे-मोटे पाझर तलावात पाणीसाठा नसल्याने भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. विहिरी, बोअरची पाणी पातळी मार्चपूर्वी खाली गेल्याने शेतकऱ्यांना टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्र घटले आहे. खरीपात सोयाबीन क्षेत्रात मोठी वाढ होणार आहे. मात्र, सोयाबीनचे भाव पडलेले आहेत. भाव ५ हजार रुपयांच्या आत आला आहे. खर्च, उत्पादन व मिळणारा बाजारभाव याचा हिशोब केला तर शेतकऱ्याच्या पदरात काहीच शिल्लक राहत नाही अशी स्थिती आहे.