मोदी सरकारच्या या १० कामांमुळे अमेरिका प्रभावित

अमेरिकेतील ग्लोबल इन्व्हेस्टमेंट बँक मॉर्गन स्टॅनलीने बदलत्या भारताचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. मॉर्गन स्टॅनलीने आपल्या एका रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत बदलला आहे. या बदलामुळे आता आशिया आणि जगभरात भारताचे महत्त्व वाढू लागले आहे. आणि आगामी काळात जागतिक अर्थव्यवस्थेत भारताची भूमिका खूप महत्वपूर्ण असेल.

आजतकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मॉर्नग स्टॅनलीच्या म्हणण्यानुसार, एका दशकापेक्षा कमी कालावधीत भारताने हा बदल केला आहे. २०१३ पासून एकदम वेगळा भारत तयार झाला आहे. यादरम्यान जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारताने मजबूत जागा तयार केली आहे. मॉर्गन स्टॅनलीच्या म्हणण्यानुसार, गेल्या नऊ वर्षात मोदी सरकार सत्तेत आल्यावर १० मोठे बदल झाल्याने परिवर्तन दिसून आले आहेत.

यामध्ये भारतात इतर देशांशी जुळण्यासाठी कॉर्पोरेट कर दर कमी करणे, पायाभूत सुविधांमध्ये वाढणारी गुंतवणूक ही सर्वात मोठी धोरणात्मक सुधारणा म्हणून ओळखली जाते. जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे केंद्र आणि राज्यांचे १२ पेक्षा जास्त कर कमी होवून एकच झाले आहेत. पुरवठा धोरणात सुधारणा, रिअल इस्टेट (रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट) अॅक्ट, बँकांमध्ये डायरेक्ट ट्रान्सफर, एफडीआयवर फोकस, मल्टिनॅशनल कंपन्यांच्या भावनांची ओखळ याचा समावेश या कामांमध्ये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here