अमेरिका : भीषण आगीत हॉलीवूड कलाकारांसह अनेकांची शेकडो घरे भस्मसात

लॉस एंजेलिस: लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या भीषण आगीत हजारो घरे भस्मसात झाली आहेत. त्याचबरोबर किमान पाच ते सात लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.तब्बल 15,000 एकर पेक्षा जास्त परिसरात ही आग पसरल्याचे एलए काउंटी फायर चीफ अँथनी मॅरोन यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. पर्जन्यवृष्टी, कोरडे इंधन आणि ताशी ९९ मैल वेगाने वाहणारे जोरदार वारे, यामुळे जंगलातील आग पसरली आहे. १९ दशलक्ष लोक या आगीने प्रभावित होण्याचा धोका वाढला आहे. एनबीसी न्यूजनुसार, संपूर्ण प्रदेशात अनेक ठिकाणी ७० मैल प्रतितास वेगाने वाऱ्याची नोंद करण्यात आली आहे.

कॅलिफोर्निया फॉरेस्ट्री अँड फायर प्रोटेक्शन विभागाच्या म्हणण्यानुसार, बुधवारी दुपारपर्यंत १५ हजारपेक्षा जास्त एकर क्षेत्रामध्ये ही आग पसरली आहे. आग मंगळवारी रात्री लॉस एंजेलिसच्या डाउनटाउन जवळ उत्तरेला असलेल्या राष्ट्रीय जंगलातील एका खोऱ्याजवळ सुरू झाली आणि पुढे मोठ्या प्रमाणात पसरत गेली, असे यूएस फॉरेस्ट सर्व्हिसने नमूद केले आहे. आग मंगळवारी रात्री सॅन फर्नांडोच्या उत्तरेकडील उपनगरी सिलमारमध्ये ब्रश फायरच्या रूपात पसरली आणि त्वरित ५०० एकरपर्यंत वाढली, असे लॉस एंजेलिस अग्निशमन प्रमुख क्रिस्टन क्रॉली यांनी एनबीसी न्यूजला सांगितले.एक लाखाहून अधिक लोकांना वाचवण्यात यश आले आहे.बुधवारी दुपारपर्यंत १.५ दशलक्षाहून अधिक लोकांची वीज खंडित करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here