शिमला : नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपशासीत राज्यांच्या कृषी मंत्र्यांसोबत एक ऑनलाइन बैठक घेतली. शहा यांनी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सांगितले की, केंद्र सरकार देशभर नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचे सातत्याने प्रयत्न करीत आहे.
हिमाचल प्रदेशचे कृषी मंत्री विरेंद्र कंवर यांनी सांगितले की, नैसर्गिक शेतीला सहकार क्षेत्राशी जोडण्यासाठी केंद्र सरकारकडून खास प्रयत्न केले जात आहेत. या बैठकीत कृषी क्षेत्राला सहकार क्षेत्राशी जोडून शेतकऱ्यांना खास लाभ देण्याविषयी चर्चा झाली. कृषी मंत्री विरेंद्र कंवर यांनी सांगितले की, नैसर्गिक शेतीच्या क्षेत्रात हिमाचल प्रदेश चांगले काम करीत आहेत. हिमाचल प्रदेशात सध्या ९,५०० एकर क्षेत्रावर नैसर्गिक शेती केली जात आहे. राज्यात ५० हजार एकरमध्ये अशी शेती करण्याचे उद्दिष्ट सरकारसमोर आहे. या बैठकीत नैसर्गिक कृषी उत्पादनांची विक्री सहकाराच्या माध्यमातून करण्याबाबतही चर्चा झाली.
हिमाचल प्रदेशचे कृषी मंत्री विरेंद्र कंवर यांनी नैसर्गिक शेतीपासून सर्वांना लाभ व्हावा, यासाठी शेतकऱ्यांना सहकार क्षेत्राशी जोडावे असे सांगितले. ते म्हणाले, हिमाचल प्रदेशात नैसर्गिक शेतीच्या उत्पादनांना १० कृषी उत्पन्न बाजार समितींच्या माध्यमातून खरेदी केले जाते. त्यातून शेतकऱ्यांना लाभ दिला जाऊ शकतो.