पानीपत : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणेसाठी हरियाणा सरकारकडून सर्वात मोठा इथेनॉल प्लांट पानीपत सहकारी साखर कारखान्यात स्थापन केला जात आहे. या प्लांटची प्रती दिन उत्पादन क्षमता ९० किलो लिटर (केएलपीडी) असेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज, १४ फेब्रुवारी रोजी आपल्या कर्नाल दौऱ्यावेळी या इथेनॉल प्लांटची पायाभरणी करतील.
साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक नवदीप सिंह यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी प्लांट स्थापन करण्यासाठी आधीच निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या निविदा १५ मार्च रोजी उघडण्यात येतील. दि ट्रिब्यूनला त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, युनिटला दोन पद्धतीने चालविले जाणार आहे. आणि यामध्ये प्लांटमध्ये दोन प्रकारच्या कच्च्या मालापासून इथेनॉलचे उत्पादन केले जाईल. यात ऊस हंगामात उत्पादित झालेले मोलॅसीस आणि धान्य म्हणजे तुकडा तांदूळ, बाजरी व इतर घटकांचा समावेश असेल.
या प्लांटमध्ये प्रती दिन ९०,००० लिटर इथेनॉलचे उत्पादन केले जाईल. हा प्लांट १५ एकर जागेत उभारला जाणार आहे. यासाठी सुमारे १५० कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.