अमृतसर: ६.७८ कोटींची थकीत ऊस बिले देण्याची शेतकऱ्यांची मागणी

अमृतसर : निकट भाला पिंड येथील सहकारी साखर कारखान्याबाहेर विभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी थकबाकी मिळावी या मागणीसाठी धरणे आंदोलन केले. जम्हुरी शेतकरी संघटनेच्या बॅनरखाली आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितले की, कारखान्याकडे ६.७८ कोटी रुपयांची बिले थकीत आहेत. तातडीने पैसे दिले गेले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.

दि ट्रिब्यूनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जम्हूरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष डॉ. सतनाम सिंह अजनाला यांनी सांगितले की, सरकारच्या ऊस नियंत्रण आदेश १९६६ अनुसार, खरेदी केल्यानंतर १५ दिवसांत बिले मिळाली नाहीत तर, शेतकऱ्यांना १५ टक्के व्याज देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

पुढील हंगामासाठी ऊसाचा दर ४५० रुपये प्रती क्विंटल निश्चित करण्याची मागणी ऊस उत्पादकांनी सरकारकडे केली. त्यांनी सांगितले की, डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या अहवालानुसार ऊसाचा दर निश्चित केला गेला पाहिजे. शेतीच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत ५० टक्के नफा मिळावा अशी शिफारस या अहवालात केली गेली होती. शेतकरी नेते कुलवंत सिंह मल्लूनांगल यांनी सांगितले की, साखर कारखान्यांकडून ऊस विक्रीसाठी तोडणी पावती जारी करताना शेतकऱ्यांना त्रास दिला जातो. अजनाला यांनी सांगितले की, साखर उद्योगातील उप उत्पादन असलेल्या इथेनॉलच्या माध्यमातून परकीय चलनाची बचत झाली आहे. भाला पिंड साखर कारखान्यात इथेनॉल युनिट स्थापन करण्यासाठी परवानगी दिली गेली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here