नवी दिल्ली : साखर उद्योगामध्ये आता निर्यातीच्या नव्या संधी मिळत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळेल अशी स्थिती आहे. आता केंद्र सरकारने ब्रिटनच्या टेरिफ रेट कोट्याअंतर्गत (टीआरक्यू) अतिरिक्त ३६७५ टन कच्चा साखर निर्यातीस परवानगी दिली आहे.
टीआरक्यू अंतर्गत केली जाणारी साखर निर्याचीमधील अपेक्षेपेक्षा कमी दराने युकेमध्ये पाठवली जाईल. कोटा पूर्ण झाल्यानंतर निर्यातीवर एक जादा दर लागू करण्यात येतो.
परदेशी व्यापार महासंचालनालयाने (डीपीएफटी) एका सार्वजनिक नोटिसीत म्हटले आहे की यावर्षी ३० सप्टेंबरपर्यंत टीआरक्यू कोट्याअंतर्गत ब्रिटनला ३,६७५.१३ टन कच्ची साखर अतिरिक्त निर्यातीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाद्वारे (एपीईडीए) निर्यातीची अंमलबजावणी केली जाणार आहे.