धामपूर, उत्तर प्रदेश: साखर कारखान्याच्या वजन लिपिक आणि ट्रान्सपोर्टर संघाच्या बैठक़ीमध्ये साखर कारखाना सुरु होण्यापुर्वी मागण्या मान्य करण्याचा मुद्दा उठवण्यात आला. त्यांनी इशारा दिला की, जर असे झाले नाही तर नाइलाजाने आंदोलन करावे लागेल.
नहटौर मार्ग येथील विराट फार्म हाऊस परिसरामध्ये झालेल्या बैठकीमध्ये वजन लिपिक संघाचे अध्यक्ष मान सिंह यांनी सांगितले की, सध्या साखर कारखान्यामध्ये जवळपास 195 वजन लिपिक काम करत आहेत. त्यांचा पगार महागाईच्या या काळामध्ये पुरेसा नाही. त्यांनी पगार कमीत कमी 25 हजार रुपये करण्याची मागणी केली. त्यांनी सांगिलते की, मोबाईल च्या माध्यमातून ते वजन कार्य करणार नाहीत. साखर कारखान्याला वजन करण्यासाठी त्यांना एचएचसी मशीन किंवा कंपनीकडून मोबाइल उपलब्ध करुन द्यावे लागतील. मागणी करण्यात आली की, कोणत्याही कर्मचार्याला झोन मधून बाहेर स्थानांतरित केले जाऊ नये . तिकडे, साखर कारखान्याचे ऊस जीएम कुलदीप शर्मा यांनी सांगितले की, त्यांच्या स्तरावरुन मागण्यांबाबत कारखान्याच्या व्यवस्थापनाला कळवण्यात करण्यात आले आहे. यावेळी राजेश कुमार, नीतिन त्यागी, योगेश, मोहित, इंद्रपाल सिंह, प्रीतम, सुनील कुमार, सुंदर कुमार आदी उपस्थित होते.