नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेवर आधारित इथेनॉल उत्पादनावर बंदी घातल्यानंतर उद्योग याबाबत सरकारच्या सतत संपर्कात असून ही बंदी हटवण्याची मागणी करीत आहे. या आठवड्यात यासंदर्भात महत्त्वाची बैठक होऊ शकते. ही बैठक कॅबिनेट सचिवांच्या नेतृत्वाखाली होऊ शकते. CNBC-TV18च्या रिपोर्टनुसार, बी हेवी मोलॅसेसपासून इथेनॉल बनवण्याबाबत आढावा घेतला जाऊ शकतो. या बैठकीत उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने अलीकडेच इथेनॉल उत्पादनासाठी साखरेचे वळविण्याची मर्यादा १७ लाख टनांपर्यंत केली आहे. त्यानंतर ही मर्यादा वाढवण्याची मागणी उद्योगांकडून होत आहे. ISMAच्या म्हणण्यानुसार, चालू हंगामात साखरेचे उत्पादन पूर्वीच्या अंदाजापेक्षा जास्त असू शकते. त्यानुसार, ISMA ने इथेनॉल उत्पादनासाठी १०-१२ लाख टन अतिरिक्त साखर वळवण्याची परवानगी देण्याची विनंती सरकारला केली आहे.