नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार सुरूच आहेत. देशात कोरोनाने मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत नवे १२ हजार १४३ रुग्ण आढळले आहेत. तर यादरम्यान कोरोनामुळे १०३पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी ही माहिती दिली. गुरुवारी कोरोनाचे नवे ९३०९ रुग्ण आढळले होते तर संक्रमणाने मृत्यू झालेल्यांची संख्या ८७ होती. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत कोरोना महामारीने बाधित नवे १२ हजार १४३ रुग्ण आढळले.
यामुळे देशातील बाधितांची आकडेवारी १ कोटी ८ लाख ९२ हजार ७४६ झाली आहे. गेल्या २४ तासांत झालेल्या १०३ मृत्यूनंतर एकूण मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १ लाख ५५ हजार ५५० झाली आहे.