धामपूर साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी ऊस घेवून येणाऱ्या वाहनांनावर रेडियम रिफ्लेक्टर लावले. या कार्यक्रमावेळी सहाय्यक साखर आयुक्त नीरज कुमार आणि कारखान्याचे अध्यक्ष सुभाष पांडे यांनी ऊस घेऊन येणाऱ्या वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत आवाहन केले.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस विभागाचे महाव्यवस्थापक ओमवीर सिंह यांनी सांगितले की, रस्ते वाहतूक टाळण्यासाठी कारखाना प्रशासनाकडून दरवर्षीप्रमाणे ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाड्या, ट्रॅक्टर – ट्रॉली, ट्रकवर रेडियम रिफ्लेक्टर लावण्यात येतात. यावर्षी सुद्धा अशा प्रकारे रिल्फेक्टर लावण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. वेळोवेळी वाहनांवर रिफ्लेक्टर लावले जातील. यावेळी खांडसरी निरीक्षक सीता शुक्ला, कारखान्याचे व्यवस्थापक विजय गुप्ता, मनोज कुमार, दिनेश राजपूत, संजीव शर्मा उपस्थित होते.