काकीनाडा : आंध्र प्रदेशच्या काकीनाडा येथील साखर कारखान्यात सोमवारी देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असताना लोखंडी गर्डर (iron girder) पडल्याने दोघांचा मृत्यू झाला. तर या अपघातात इतर दोघेजण गंभीर जखमी झाले.
ANI मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, काकीनाडा येथील पोलीस अधीक्षक एम. रवींद्रनाथ बाबू यांनी सांगितले की, वाकलापुडीमध्ये साखर कारखान्यात दुरुस्तीचे एक प्लॅटफॉर्म कोसळला. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे प्रसाद आणि सुब्रमण्यम आहे. इतर दोन कामगारांना दुखापत झाली आहे आणि त्यांच्यावर अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसात घटना नोंदविण्यात आली आहे. सर्पवाराम पोलीस ठाण्यातर्फे या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.