हैदराबाद : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांनी चाडेपल्ली येथे सीएम कॅम्प कार्यालयात राज्यातील गुंतवणूक संवर्धन बोर्डाची (SIPB) बैठक घेतली. कृषक भारती को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (KRIBHCO) नेल्लोर जिल्ह्यातील सर्वपल्लीमध्ये दोन टप्प्यात एका बायो-इथेनॉल प्लांटची स्थापना करेल. या प्लांटची क्षमता २५० केएलडी असेल. आणि यासाठी ५६० कोटी रुपये गुंतवणूक करण्याची योजना तयार करण्यात आली आहे असे सांगण्यात आले. १०० एकरात उभारणी केल्या जाणाऱ्या या प्लांटमधून ४०० लोकांना रोजगार मिळेल.
आंध्र प्रदेश निर्यात प्रोत्साहन धोरण २०२२-२७ अंतर्गत, पाच वर्षात सध्याच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि दुप्पट करण्यासाठी नव्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पुढील पाच वर्षात निर्यात ३.५ लाख कोटी रुपयांवर पोहोचविण्याचे उद्दीष्ट आहे. आणि SIPBने या साठी अनेक धोरणांना मंजुरी दिली आहे. जगन यांनी सांगितले की, राज्यातील बहुतांश निर्यात क्षेत्र एकिकृत आहेत. आणि या उत्पादनांची गुणवत्ता वाढविण्यासाठी त्यांनी पावले उचलण्याच्या सूचना केल्या आहेत. ते म्हणाले की, शेतकरी केंद्रांच्या माध्यमातून उत्पादनांमध्ये गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाययोजना केली जाईल. मुख्यमंत्री जगन म्हणाले की, देशातील ४६ टक्के समुद्री निर्यात आंध्र प्रदेशातून होते. यासाठी या क्षेत्राता योग्य प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांनी एक खिडकी योजनेंतर्गत उद्योगांसाठी मंजुरीच्या प्रक्रियेवर सतत लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला. अधिकाऱ्यांनी विशाखापट्टणम येथे डेटा सेंटर स्थापन करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत असे निर्देशही त्यांनी दिले.