तिरुपती : खासदार डॉ. एम. गुरुमुर्ती यांनी एपीआयआयसी आणि आंध्र प्रदेशच्या उद्योग विभागातील अधिकाऱ्यांसह मंगळवारी नवी दिल्लीत केंद्रीय रसायन आणि खत राज्यमंत्री भगवंत खुबा यांची भेट घेतील. केंद्रीय रसायन आणि खत मंत्रालयाने Kribhco ला पुढील सहा महिन्यातं नेल्लोर जिल्ह्यात सर्वपल्ली येथे बायो-इथेनॉल प्लांट स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वपल्ली मधील बायो-इथेनॉल प्लांटची स्थापना करण्यासाठी मंत्रालयाने औपचारिक मंजुरी दिली आहे.
तिरुपतीचे खासदार डॉ. एम. गरुमुर्ती यांनी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांचे तिरुपती लोकसभा क्षेत्रात बायो इथेनॉल प्लांटला मंजुरी दिल्याबद्दल आभार मानले. हा जैव इथेनॉल प्लांट स्थानिक युवकांना रोजगाराच्या खूप संधी देईल. या क्षेत्रात नव्याने गुंतवणूक येईल. एपीआयआयसीने ७०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह Kribhco ला फॉस्फेट आणि डीएपी (खत) निर्मितीसाठी प्लांट स्थापन करण्यासाठी २८९.८१ एकर जमीन मंजुर केली आहे. जमीन Kribhcoला २०१५ मध्ये देण्यात आली होती. मात्र, वाहतूक आणि इतर मुद्यांमुळे या योजनेत अडचणी निर्माण झाल्या.
तिरुपतीचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर डॉ. एम. गुरुमूर्ती यांनी Kribhco आणि एपीआयआयसी तसेच उद्योग विभागासोबत बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी सर्वपल्ली मध्ये Kribhcoला मंजूर केलेल्या जागेवर व्यवहार्य योजना राबविण्यासाठी प्रस्ताव देण्यास सांगितले होते. त्यानंतर बायो-इथेनॉल प्लांट स्थापन करण्याचा विचार करण्यात आला.