बुलंदशहर : जहांगीराबादमधील डुंगरा येथील साखर कारखान्याने उसाचे वजन करून घेत घेतल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी उसाची मोळी पेटवून चार तास जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. उसाने भरलेला ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर लावण्यात आला.
भारतीय किसान युनियन महाशक्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष धर्मेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली. जहांगीराबाद येथील साखर कारखान्याकडे शेतकरी ऊस घेऊन जात आहेत. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून तोलाई बंद असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. शेतकऱ्यांचा ऊस ट्रॉली मध्ये वाळत पडल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी शेतकऱ्यांनी कारखान्यासमोरही धरणे आंदोलन केले. तरीही तोलाई सुरू झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
शेतकऱ्यांनी गेटसमोर उसाची ट्रॉली लावली. त्यानंतर मोळी जाळत कारखाना प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकऱ्यांनी कारखाना सुरू करण्याच्या आदेशाची मागणी केली. बंटी सिंह, सुनील सिंह, हबीब खान, शाह आलम, सुमित राणा, सुंदर सिंह, राहुल कुमार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान, आंदोलनावेळी उप जिल्हाधिकारी रवींद्र कुमार आणि जिल्हा ऊस अधिकारी डी. के. सैनी यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. एका तासात कारखाना सुरू करण्याचे आदेश देऊन ऊस वजन करून घेतला जाईल असे सांगितल्यानंतर शेतकरी शांत झाले. तर भारतीय किसान युनियन महाशक्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष धर्मेंद्र सिंह म्हणाले, कारखाना प्रशासनाच्या अडेलतट्टूपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. कारखाना लवकर सुरू झाला नाही तर बेमुदत आंदोलन केले जाईल.