बेंगळुरू : कर्नाटकातील नवनिर्वाचित काँग्रेस सरकारने महिलांना राज्यातील सरकारी बससेवेत मोफत प्रवासाची शक्ती योजना लागू केल्यानंतर एक जुलैपासून बीपीएल कुटूंबांना १० किलो मोफत तांदळाची ‘अन्नाल भाग्यक योजना’ सुरू करण्याच्या तयारीत आहे. अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री के. एचट. मुनियुप्पा यांनी शुक्रवारी सांगितले की, शनिवारपासून अन्ना भाग्य योजना सुरू होत आहे. सरकार लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट पैसे जमा करेल.
ते म्हणाले की, सरकारकडे ९० टक्के बिपीएल लाभार्थ्यांच्या बँक खात्यांची माहिती आहे. ज्यांच्याकडे खाते नाही, त्यांनी ते सुरू करावे. प्रत्येक व्यक्तीला १७ रुपये दिले जातील. जोपर्यंत तांदूळ उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत डीबीटीच्या माध्यमातून पैसे देऊ. तांदूळ उपलब्ध झाल्यानंतर तोही दिला जाईल. दक्षिणेत नाचणी दिली जाईल तर उत्तरेत ज्वारी दिली जाणार आहे. सोबतच पाच किलो तांदूळ दिला जाणार आहे. पैसे उपलब्ध आहेत आणि ते शनिवारी जमा केले जातील.
मुनियप्पा म्हणाले की, दोन किलो नाचणी, ज्वारी, आठ किलो तांदूळ वितरण केले जाईल. एक जुलैपासून आश्वासनानुसार योजना सुरू होत आहे. केंद्र सरकारकडे तांदूळ आहे. जर त्यांनी होकार दिला तर लाभार्थ्यांना तांदूळ दिला जाईल. काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत या योजनेची घोषणा केली होती. पाच जाहीर घोषणांमध्ये बीपीएल कुटूंबाला १० किलो तांदूळ देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.