कोल्हापूर : श्री अन्नपूर्णा शुगर अॅण्ड जॅगरी वर्क्स लि. केनवडे (ता. कागल) या साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात २ लाख ४ हजार ७४१ मेट्रिक टन ऊस गाळप केले. कारखान्याच्या तिसऱ्या गळीत हंगामाची वाहनांच्या सवाद्य मिरवणुकीने यशस्वी सांगता झाली. ट्रॅक्टर व बैलगाडी चालकांनी मोठ्या उत्साहात वाद्यांच्या गजरात मिरवणुकीने उसाच्या अंतिम खेपा कारखान्याकडे पोहोच केल्या.
मिरवणुकीत चेअरमन माजी आमदार संजय घाटगे, ‘गोकुळ’चे संचालक अंबरिषसिंह घाटगे सहभागी झाले होते. कारखान्याचे संचालक दत्तोपंत वालावलकर, एम. बी. पाटील, तानाजी पाटील, विश्वास दिंडोर्ले, धनाजी गोधडे यांची भाषणे झाली. यावेळी चिफ केमिस्ट सुनील कोकितकर, राजू मोरे, एच. एस. पाटील, एस. एस. चौगले, विष्णू पाटील, कृष्णात कदम, ट्रॅक्टर मालक बाजीराव पाटील, युवराज कोईगडे, दत्तात्रय दंडवते उपस्थित होते.