पिपराईच साखर कारखान्याची डिस्टलरी युनिटची घोषणा

लखनौ : उत्तर प्रदेश सरकारने गोरखपूर जिल्ह्यातील पिपराइच साखर कारखान्यात १२० लिटर प्रती दिन (एलपीडी) क्षमतेची डिस्टलरी युनिट सुरू करण्याची घोषणा केली आहे. कारखान्यात दररोज ५००० टन उसाचे गाळप केले जाते. टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार केंद्र सरकारच्या इथेनॉल उत्पादन धोरणांतर्गत या युनिटची स्थापना केली जात असल्याचे सरकारी प्रवक्त्यांनी सांगितले आहे. उसाच्या रसापासून थेट इथेनॉल उत्पादन करणारा हा उत्तर प्रदेशातील पहिला प्लांट असेल. राज्य सरकारने सत्तेवर आल्यानंतर २०१७ मध्ये बंद असलेला बस्तीमधील मुंडेरवा साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यात आला होता. ब्रिटिशांच्या काळातील हा कारखाना आधीच्या सरकारने बंद केला होता अशी माहिती या प्रवक्त्यांनी दिली.

गेल्या सरकारच्या काळात बंद पडलेले तीन साखर कारखाने राज्य सरकारने पुन्हा सुरू केले आहेत. आणि उत्तर प्रदेश आता देशात साखर उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे. नजीबाबाद सहकारी साखर कारखान्याने इथेनॉल प्लांट सुरू केला आहे. सरकारने बागपतमधील रमाला साखर कारखान्याची गाळप क्षमता २७५० टीडीसीवरुन वाढवून ५००० टीडीसी आणि मेरठमधील मोहिउद्दीनपूर कारखान्याची गाळप क्षमता २५०० टीसीडीवरुन ३५०० टीडीसीपर्यंत वाढवण्यात आली आहे असे सूत्रांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here