पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा

पुणे : लोकमान्य टिळक मेमोरिअल ट्रस्टने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावर्षीचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केला. टिळक मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी सोमवारी (१० जुलै २०२३) पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली. मंगळवारी, 1 ऑगस्ट 2023 रोजी लोकमान्य टिळकांची 103 वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार देणार आहे. पुरस्काराचे यंदाचे ४१ वे वर्ष आहे.या सोहळ्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आल्याचे रोहित टिळक यांनी सांगितले. आतापर्यंत एस.एम.जोशी, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी, शंकर दयाळ शर्मा, बाळासाहेब देवरस, खान अब्दुल गफार खान, शरद पवार, एनआर नारायणमूर्ती, जी. माधवन नायर, डॉ. कोटा हरिनारायण, राहुल बजाज. , बाबा कल्याणी, ई. श्रीधरन, एम.एस. स्वामिनाथन, डॉ. वर्गीस कुरियन आणि विविध क्षेत्रातील दिग्गजांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here