मेरठ : दौराला साखर कारखान्याचा गळीत हंगाम आता समाप्तीच्या टप्प्यावर आहे. या हंगामात कारखान्याचा गळीत हंगाम नोव्हेंबर २०२२ मध्ये सुरू झाला होता. कारखान्याला एकूण १६७ ऊस खरेदी केंद्रे मंजूर करण्यात आले होते. या केंद्रांमधील इंडेंट एक मे रोजी समाप्त झाले आहेत. जवळपास निम्मी केंद्रे पूर्णपणे बंद झाली आहेत.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कारखान्याचे वरिष्ठ महाव्यवस्थापक संजीव खाटियान यांनी सांगितले की, कारखाना सध्या मुक्त ऊस खरेदी करीत आहे. मात्र, पुरेसा ऊस मिळत नाही. त्यामुळे २ मे २०२३ रोजी कारखाना बंदची नोटीस लावण्यात आली. त्यानंतरही ऊस पुरवठा वाढला नाही. त्यामुळे ४ मे रोजी कारखाना बंद करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे ऊस आहे, अशा शेतकऱ्यांनी या दोन दिवसांत आपला ऊस कारखान्याला पुरवठा करावा. जर तोडणी पावती नसेल तर कारखाना गेटवर पावती उपलब्ध करून दिली जाईल.