थकीत ऊस बिलांच्या मुद्यावर २७ पंचायत आयोजित करण्याची घोषणा

बुढाना : शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलांसह विविध समस्यांबाबत रालोद पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत थकीत ऊस बिलाचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. यावेळी २७ ऑगस्ट रोजी ऊस समिती कार्यालयाच्या परिसरात पंचायत आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या थकबाकीबाबत लोक निर्माण विभागाच्या भवनात रालोद कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये याबाबत आता आरपारची लढाई सुरू करण्याचे कार्यकर्त्यांनी ठरवले.

रालोदचे आमदार व विधीमंडळ गटनेते राजपाल बालियान यांनी सांगितले की, थकबाकीबाबत राज्यातील सर्वच ठिकाणचे शेतकरी हवालदिल झाले आहेत. बँका आणि वीज मंडळाकडून त्यांना नोटीसा दिल्या जात आहेत. सरकार शेतकऱ्यांचे शोषण करीत आहे. अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, माजी मंत्री योगराज सिंह म्हणाले की, शेतकरी आणि कामगार ऊस बिलांवर अवलंबून आहेत. शेतकऱ्यांच्या हाती पैसे नसल्याने विभागातील दुकानदारही चिंतेत आहेत. यावेळी सर्वांच्या संम्मतीने २७ ऑगस्ट रोजी ऊस समिती कार्यालयाच्या परिसरात पंचायत आयोजित करण्याचा निर्णय झाला. विरोधी पक्षाच्या जिल्हा पंचायत सदस्यांनी कामकाज चालू न देण्याबाबत चर्चा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here