इस्लामाबाद: साखरेच्या वाढत्या महागाईमुळे अडचणीत आलेल्या पाकिस्तानी नागरीकांना लवकरच दिलासा मिळू शकेल, कारण सरकारने साखर आयात करण्यासाठी गतीने पावले टाकली आहेत.मीडिया रिपोर्टनुसार, ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तानने (टीसीपी) शुक्रवारी एक लाख टन पांढरी साखर खरेदी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय निविदा काढल्या. 15 सप्टेंबर रोजी निविदा बंद होईल. टीसीपीची 100,000 टन साखरेची अखेरची निविदा 8 सप्टेंबर रोजी बंद झाली..
उद्योग आणि उत्पादन मंत्री हम्माद अजहर यांनी 24 ऑगस्ट ला सांगितले होते की, देशामध्ये साखर आयात झाल्यावर लगेचच दरामध्ये घट होईल. ज्यामुळे महागाईमुळे वैतागलेल्या लोकांना मोठा दिलासा मिळेल. त्यांनी दावा केला होता की, देशामध्ये साखरेच्या आयातीनंतर, साखर तस्कर खुल्या बाजारात आपला स्टॉक उतरवणे सुरु करतील. ज्यामुळे साखरेच्या दरामध्ये अधिक कमी येईल. आयातीच्या बातम्यांनंतर साखरेचे दर यापूर्वीच घटले आहेत. मंत्री अजहर यांनी सांगितले की, पाकिस्तानी तहरीक एक इंसाफ सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेला योग्य मार्गावर आणण्यासाठी मोठे कष्ट करत आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.