कल्लाप्पाण्णा आवाडे साखर कारखान्याची १६ सप्टेंबरला ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

कोल्हापूर :  कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरी- यळगुड या संस्थेची २०२२-२०२३ वर्षाकरिता ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दि. १६ सप्टेंबर, २०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित करण्यात आली आहे.

या सभेपुढील विषय असे, १) दि. २९ सप्टेंबर, २०२२ रोजी झालेल्या ३३ व्या वार्षिक  सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे. २)२०२२-२३ वर्षातील कामकाजाचा संचालक मंडळाने सादर केलेला अहवाल स्वीकारणे व त्याची नोंद घेणे. ३) २०२२-२३ या वर्षात झालेला भांडवली खर्च व गुंतवणुकीची नोंद घेवून त्यास मंजुरी देणे. ४) २०२२-२३ वर्षामध्ये अंदाजपत्रकापेक्षा कमी-अधिक झालेल्या खर्चास मंजुरी देणे.५) दि. ३१ मार्च, २०२३ अखेर वर्षाचे नफा तोटा व ताळेबंद पत्रक दाखल करून घेऊन त्यास मंजुरी देणे, ६) दि. ३१ मार्च, २०२३ अखेर लेखापरिक्षक यांच्या हिशोब तपासणी अहवालाचे अवलोकन करून संचालक मंडळाने सादर केलेला दोष-दरूस्ती अहवाल स्वीकारणे ७)२०२३-२४ वर्षाकरिता मा. संचालक मंडळाने सादर केलेल्या महसुली व भांडवली अंदाजपत्रकाची आणि भांडवल उभारणीसाठी सुचविलेल्या योजनांची नोंद घेणे. ८) २०२३-२४ वर्षासाठी लेखापरिक्षक यांची नियुक्ती करणे व त्यांचा मेहनताना ठरविणे.९) संचालक सदस्य अथवा त्यांच्या नातेवाईकांना दिलेली कर्जे व त्यांनी केलेली परतफेड आणि येणे रकमेचा आढावा घेणे, १०) संचालक सदस्य आणि कार्यकारी संचालक यांचे कारखान्यामध्ये सेवेत असलेल्या नातेवाईकांची नोंद घेणे.११)अध्यक्ष यांच्या परवानगीने सभेपुढे येणाऱ्या आयत्यावेळच्या विषयांचा विचार करणे.

तरी सर्व सभासदांनी सभेस अवश्य उपस्थित रहावे, असे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here