पंचगंगा साखर कारखान्याची १५ सप्टेंबर २०२३ ला वार्षिक सर्वसाधारण सभा

कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पान्ना कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याची २०२२-२०२३ वर्षाची ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, दिनांक १५-०९-२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता पंचरत्न सांस्कृतिक भवन, कारखाना पेट्रोल पंपाजवळ, गंगानगर- इलकरंजी या ठिकाणी होणार आहे. तरी या सभेस संस्थेच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.

या सभेपुढील विषय असे, १५-०९-२०२२ रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे, २०२२-२०२३ या वर्षाच्या मुदतीचा संचालक मंडळाने सादर केलेला अहवाल स्वीकारणे, २०२२-२०२३ अखेरचे ताळेबंद व नफा-तोटा पत्रक दाखल करून घेऊन त्यास मंजुरी देणे, २०२२-२०२३ या वर्षाचा लेखा परीक्षक यांचा हिशोब तपासणी अहवाल अवलोकनेत येवून त्यावरील संचालक मंडळाने सादर केलेला दोष दुरुस्ती अहवाल स्वीकारणे, २०२३ २०२४ सालाकरिता हिशोब तपासणीसाची तसेच आवश्यक त्या सल्लागारांची नेमणूक करणे व त्यांचा मेहनताना ठरविण्याचा अधिकार संचालक मंडळास देणे, संचालक मंडळाने सादर केलेल्या ०१-०४-२०२३ ते ३१-०३-२०२४ अखेर मुदतीच्या अंदाजपत्रकाची नोंद घेणे आणि २०२२-२०२३ मध्ये अंदाज पत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास मंजुरी देणे, कारखान्याचे संचालक सदस्य अथवा त्यांचे नातेवाईकांना दिलेली कर्जे व परतफेड आणि येणे रक्कमांचा आढावा घेणे. शासकीय धोरणानुसार भाग विकास निधीच्या जमा असलेल्या रक्कमेतून केलेल्या विनियोगास मंजुरी देणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here