सोमेश्वर कारखान्याची २९ सप्टेंबरला वार्षिक सर्वसाधारण सभा

पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची २०२२- २३ ची अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. २९) रोजी दुपारी १ वाजता कारखाना कार्यस्थळावर होणार आहे. सभेसाठी सर्व सभासदांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी केले आहे.

या सभेत गेल्यावर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे, संस्थेचा २०२२-२३ या वर्षाचा संचालक मंडळाकडून आलेला अहवाल, ताळेबंद व नफातोटा पत्रके दाखल करून घेणे व त्याचा स्वीकार करणे, २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये अंदाजपत्रकातील तरतुदीपेक्षा ज्यादा झालेल्या खर्चास संचालक मंडळाच्या शिफारशीनुसार मंजुरी देणेबाबत विचार करणे, २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता संचालक मंडळाने तयार केलेल्या अंदाजपत्रकाची व त्यांनी सुचविलेल्या भांडवल उभारणीबाबतची नोंद घेणे, वैधानिक लेखापरीक्षक यांनी कारखान्याच्या २०२२-२३ या वर्षाच्या दिलेल्या लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेणे व मागील २०२१- २२ या वर्षाचा लेखापरीक्षण अहवालाचा संचालक मंडळाने सादर केलेला दोषदुरुस्ती अहवाल स्वीकारणे हे मुद्दे यामध्ये सहभागी आहेत.

त्याचबरोबर २०२३-२४ साठी लेखापरीक्षकाची नेमणूक करणे व लेखापरीक्षण शुल्क ठरविणे, कारखाना विस्तारवाढ प्रकल्पाचे भांडवली खर्चाची नोंद घेऊन त्यास मंजुरी देणे, डिस्टिलरी विस्तारवाद करणेबाबत विचार करणे २०२२- २३ या गाळप हंगामातील ऊस बिलात् भागविकास निधी योजनेअंतर्गत शिक्षण निधी कपाल करणेबाबत विचार करणे, तसेच ग्रामपंचायत वापळवाडी- सोमेश्वरनगर यांना कारखाना मालकीची जागा विनामोबदला बक्षीसपत्राने हस्तांतरित करण्यास मान्यता देणे आदी विषयांवर सभा पार पडणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here