सातारा : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची ( रेठरे बुद्रुक पो.शिवनगर, ता. कराड) २०२२-२३ या आर्थिक वर्षाची अधिमंडळाची ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, दि. १२/०९/२०२३ रोजी दुपारी १.०० वाजता होणार आहे. ही सभा कारखान्याच्या कार्यस्थळावरील प्राथमिक मराठी शाळेच्या समोरील प्रांगणात कारखान्याचे चेअरमन मा. डॉ. सुरेश जयवंतराव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
सभेपुढील विषय असे, मागील अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे, २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा संचालक मंडळाने सादर केलेला अहवाल स्विकारणे, २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे संचालक मंडळाने सादर केलेले नफातोटा पत्रक आणि ताळेबंद दाखल करून घेणे व मंजूर करणे, २०२२-२३ च्या अंदाजपत्रकातील मंजूर तरतुदीपेक्षा प्रत्यक्षात कमी-अधिक झालेल्या जमा खर्चास मंजूरी देणे, २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी संचालक मंडळाने सादर केलेल्या कामास मंजूरी देणे, वैधानिक लेखापरिक्षक यांच्याकडून आलेला आर्थिक वर्ष २०२२-२३ चा वैधानिक लेखापरिक्षण अहवाल स्वीकारणे, २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरीता शासनमान्य लेखापरिक्षकांच्या नामतालिकेमधून वैधानिक लेखापरिक्षकांची नेमणूक करणे व त्यांचे लेखापरिक्षण शुल्क ठरविणे,उपविधी क्र.४ अन्वये, आर्थिक वर्ष सन २०२४-२५ करिता कर्ज आणि भांडवल उभारणीस मंजूरी देणे, २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये निरुपयोगी (भंगार) मालाची ई ऑक्शनद्वारे केलेल्या विक्रीची माहिती घेऊन त्यास मंजूरी देणे.
सभासदांना सूचना करण्यात आली आहे कि, सभेस येताना प्रवेश पत्रिका, ओळखपत्र / स्मार्ट कार्ड आणणे आवश्यक आहे. सहकारी सोसायट्यांतर्फे उपस्थित राहण्यासाठी प्रतिनिधीला अधिकार दिल्याबद्दल पंच कमिटीचा ठराव दि.०५/०९/२०२३ च्या आत कारखाना कार्यालयात मिळेल, अशा रितीने पाठवावा आणि त्याची प्रत प्रतिनिधींनी सभेच्या दिवशी बरोबर आणावी. ज्या सभासदांना कारखान्याचे कामकाजाबाबत, अडी-अडचणींबाबत काही प्रश्न विचारावयाचे असतील तर त्यांनी ते दिनांक ०५/०९/२०२३ च्या आत कारखान्याच्या कार्यालयात पोहोचतील अशा रितीने लेखी स्वरुपात पाठवावेत, असे आवाहन कारखाना प्रशासनाने केले आहे.