सांगली : चिखली (ता. शिराळा) येथील विश्वास सहकारी साखर कारखान्याची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (२६ ऑगस्ट २०२३) लोकनेते फत्तेसिंगराव नाईक लायन्स सेवा केंद्रात होणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी दिली. ते म्हणाले, कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी एक वाजता सभा सुरू होईल.
यावेळी उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील- सरुडकर यांच्यासह सर्व विश्वासराव नाईक संचालक मंडळ उपस्थित असणार सहकारी साखर आहेत. कारखान्याची सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. ही सभा फक्त सभासदांसाठी आहे. कारखान्याच्या सर्व सभासदांनी सभेसाठी वेळेत उपस्थित राहावे, ही असे आवाहन पाटील यांनी केले आहे.